पुणे दि १८ :- पुणे परिसरातील रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामा निमित्त बंद राहतील.
1. घोरपडी आणि सासवड रोड रेल्वे स्टेशन च्या दरम्यान असलेले रेलवे फाटक संख्या 8 (काळेपडळ एरिया) किलोमीटर 9/2-3, दुरुस्तीच्या कामानिमित्त दिनांक 21.12.2019 सकाळी 07.00 वाजल्या पासून ते दिनांक 22.12.2019 संध्याकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहील या कारणास्तव या कालावधीत येथून सर्व प्रकारची रस्ता वाहतुक बंद राहील. रेलवे फाटक संख्या 8 बंद असण्याच्या वरील वेळेत रेल्वे फाटक संख्या 7 (सय्यदनगर ) चा उपयोग रस्ता वाहतुकीसाठी करता येईल.
2. पुणे व हडपसर रेल्वे स्टेशन च्या दरम्यान असलेले रेलवे फाटक संख्या 68 A (अनंत थिएटर जवळ) किलोमीटर 194/6-7, दुरुस्तीच्या कामानिमित्त दिनांक 21.12.2019 सकाळी 08.00 वाजल्या पासून ते रात्री 09.00 वाजेपर्यंत बंद राहील या कारणास्तव या कालावधीत येथून सर्व प्रकारची रस्ता वाहतुक बंद राहील.