पिंपरी दि १९ :- मध्ये रात्रीच्या वेळी चालणाऱ्या अंडा भुर्जी व चायनीज ईतर पदार्थ वर पिंपरी-चिंचवड पोलिसांनीअंडाभुर्जी, चायनीज विकणाऱ्या १३६ जणांवर गुन्हे तर ५६३ जणांवर खटले भरण्यात आले आहेत व वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी सुरु केलेल्या विशेष मोहिमेमध्ये रात्रीच्या वेळी अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणाऱ्या १३६ जणांवर गुन्हे तर ५६३ जणांवर खटले भरण्यात आले आहेत.पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हातगाड्या व काई टपऱ्या अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणा-यांव कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील मुंबई पोलीस कायदा कलम ११२, ११७ अन्वये भोसरी एमआयडीसी वगळता सर्व पोलीस ठाण्यात एकूण ३६६ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत तर, सार्वजनिक वाहतूक व नागरिकांना अडथळा होईल अशी वाहने, हातगाडी लावल्याप्रकरणी मुंबई पोलीस कायदा कलम १०२ अन्वये पिंपरी, दिघी आणि तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकूण १७ खटले नोंदवले आहेत.