पुणे दि १९ :- पाषाण सुतार वाडी परिसरात घराजवळील भैरवनाथ मंदिरा जवळ खेळत असणाऱ्या एका ८ वर्षाच्या चिमुकलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे शहरातील पाषाण सुतार वाडी भागात काल रात्री ८ वाजता ही घटना घडली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पाषाण येथील सुतारवाडी परिसरात राहण्यास आहे.८ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी येथील मंदिराजवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत खेळत होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला पकडून एका कोपऱ्यात नेले. त्याठिकाणी आरोपीने लैंगिक अत्याचार केला.
पीडित मुलगी ओरडू लागल्याने आरोपी नराधमाणे तिला बोचकरून तेथून पळ काढला. पीडित मुलगी रडत-रडत घरी गेल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. त्यांनतर पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास चतु:शृंगी पोलिस करत आहेत.