शिरूर दि १९ :- शिरूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मांडणंगाव फराटा येथे पत्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी जुगार अड्डावर धाड घातली. त्यात १० जणांना अटक करण्यात आली आहे. मांडणंगाव फराटा येथे पत्यांचा जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. व संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा) जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना. स्वप्नील अहिवळे,पो.कॉ. विशाल जावळे,पो.कॉ. शर्मा पवार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख,भिगवण पोलीस स्टेशन तसेच प्रवीण खानापुरे सहा. पोलीस निरीक्षक शिरूर पो स्टे आबा जगदाळे सहा.फौजदार शिरूर पो स्टे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे छापा घातला व जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले.असुन त्यांच्याकडून १ लाख ४४ हजार ५३० रुपये रुपयांचे जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.या सर्व १० जणांना अटक केलीआहे व पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख भिगवण पोलीस स्टेशन तसेच प्रवीण खानापुरे सहा. पोलीस निरीक्षक शिरूर पो स्टे आबा जगदाळे सहा.फौजदार शिरूर पो स्टे करीत आहे