पिंपरी दि २०: – काही महापालिकेची आगामी निवडणूक वार्ड पद्धतीने होणार आहे. व एक वार्ड निवडणूक पध्दतीचा सामान्य कार्यकर्त्यांना फायदा होणार आहे. तसेच विकासकामात अडसर ठरणार नसून प्रशासनाची डोकेदुखी कमी होण्यास मदत होणार आहे.महापालिकेच्या आगामी निवडणूका एक किंवा द्विसदस्यीय पद्धतीने होतील असे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील महापालिकेच्या निवडणूका बहुसदस्यीय पद्धतीऐवजी वार्ड पध्दतीने घेण्यात येणार आहेत. त्यावर विधानसभेत काल (गुरुवारी) शिक्कामोर्तब करण्यात आले.व सरकारने वॉर्ड पध्दतीने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलू शकतात. बहुसदस्यीय प्रभाग मोठे होते. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढविणे शक्य होत नव्हते. एक वार्ड निवडणूक पध्दतीने महापालिका निवडणूक होणार असल्याने सामान्य कार्यकर्त्यांना त्याचा फायदा होणार आहे. निवडणूक लढविणे सोपे जाणार आहे.बहुसदस्यीय पद्धतीत प्रभागात चार नगरसेवक होते. काही प्रभागात वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत. विकासकामे करताना नगरसेवकांमध्ये एकमत होत नाही. कामे अडविली जातात. त्यामुळे कामांवर परिणाम होत होता. वार्ड पद्धतीत एकच नगरसेवक असल्याने अडचण येणार नाही. त्यामुळे विकासकामत अडचण ठरणार नाही. चार वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक असलेल्या प्रभागात अधिकाऱ्यांची देखील अडचण होत होती. विकास कामे करताना नगरसेवकांमध्ये मतभेद झाल्यास कामे रेंगाळत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढत होती. एक वार्ड झाल्यामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी कमी होण्यास मदत होणार आहे.