पिंपरी दि १७ : -पुणे बाणेर परिसरात पतीच्या मित्रानेच पिस्तुलाचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार बाणेर येथे घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बाळासाहेब सदाशिव मुरकूटे (३३, रा. बाणेर,गाव पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी २०१६ ते मे २०१९ या कालावधीत बाणेर येथे घडला. मुरकूटे हा पीडित विवाहितेच्या पतीचा मित्र आहे. त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून आणि त्यांचा पती, मुलांना जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. त्याची अश्लिल चित्रफित तयार करून ती व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी बलात्कार केले आहे व पुढील तपास पोउनि. रूपनर करीत आहे