अहमदनगर दि १७ : – अहमदनगर शहरातील न्यू टिळक रस्त्यावरील स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अहमदनगर मध्ये न्यू टिळक रोडवर विनापरवाना स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लर सुरू असल्याची गोपनीय माहिती अहमदनगर शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली.होती व मिळालेल्या माहितीच्या आधारे मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या पथकांनी दि १६ रोजी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास स्मोकी व्हिल्लावर छापा टाकला.यावेळी हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले. हुक्का पार्लरमधील साहित्य पोलीसांनी जप्त केले. आहे