पुणे ग्रामीण दि १६ :- ,सासवड पोलीस स्टेशन हद्दीत सासवड हद्दीत PMT बस स्टँड या ठिकाणी येथे ऑनलाइन मटका मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सदर माहिती वरून खालील नमूद अधिकारी आणि पोलीस जवान यांनी नियोजन करून सासवड या ठिकाणी छापा मारला आसताना सुमारे १ लाख ६४ हजार ३५० रु रोख रक्कम व मुद्देमाल जप्त केला आहे व १० जणांना अटक केली आहे. याबाबत गोपनीय खबऱ्या मार्फत या पथकाला ही माहिती मिळाली होती यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांनी सदर ठिकाणी रेड करण्यास सांगितले होते. व सदर ची कामगिरी ही, संदिप पाटील सो पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रा)जयंत मीना सो अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच पथकाचे
चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक,बारामती क्राईम ब्रँच चे पो.हवा. संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पो.ना.स्वप्नीलअहिवळे,पो.कॉ. विशाल जावळे,
पो.कॉ. शर्मा पवार,तसेच, पो.कॉ. नाथ जगताप, योगेश कुलकर्णी, अजित राऊत बारामती शहर पोलीस स्टेशन
तसेच दगडू हाके, पोलीस निरीक्षक सासवड पो स्टेपो.कॉ. भाऊसो खाडे, काळभोर सासवड पो स्टे यांनी केली यांनी छापा मारून खालील वर्णनाचा माल हस्तगत केला.
1) 65,850= रोख रक्कम
2) 98,500= 4 LCD TV, 7 मोबाईल संच, 2 जिओ चे राऊटर
————————-
1,64,350 चा माल जप्त करण्यात आला आहे..साहित्य.
असा सुमारे १लाख ६४ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच १० आरोपीना अटक करण्यात आली.आहे व पुढील तपास सासवड पो स्टे करीत आहे