पिंपरी दि १६ :- पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर शनिवारी दि १४ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास परंदवडी सोमाटणे ओढ्याजवळ कोयत्याने वार करीत खूनी हल्ला झाला.होता व गुन्ह्यातील एका आरोपीला १६ तासाच्या आत गुन्हे शाखेच्या खंडणी विराधी पथकाने अटक केली. रोहन दिनकर गरोडे असे खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद उर्फ परशा टेभेकर (रा. उर्से) आकाश साळुखे, केतन पोकळे (दोघेही रा. सोमाटणे फाटा) हर्षद भोकरे, (रा. शिवणे), अनु उर्फ अनराधा काळे (रा. तळेगाव दाभाडे) व इतर दोन अनोळखी व्यक्ती (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात खूनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
शनिवारी सायंकाळी फिर्यादी अदित्य विलास गराडे व रोहन दिनकर गराडे असे दोघेजण त्यांच्या स्कुटी दुचाकीवरून एका कंपनीमध्ये चहा घेऊन जात होते.
परंदवडी – सोमाटणे रोडवरील ओढयाजवळ आरोपींनी आपसांत संगनमत करून रोहन गराडे यास पूर्वीचे भांडण्याचे कारणावरून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने वार केले. याप्रकरणी तळेगाव दभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खंडणी विरोधी शाखेचे पोलीस नाईक शरीफ मुलाणी यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार साईनगर, देहरोड येथे सापळा रचून आरोपी केतन दत्तात्रय पोकळे (वय २२, रा. सोमाटणे फाटा) याला अटक केली. त्याने आपल्या साथीदारांसह केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, अनिकेत हिवरकर कर्मचारी अजय भोसले, उमेश पलगम, निशांत काळे, किरण काटकर, आशिष बोटके, शरीफ मुलाणी, सागर शेडगे, आशिष बनकर, गणेश कोकणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.