टेंभुर्णी दि १५ :- (प्रतिनिधी) पुणे सोलापूर
रोडवरील तीर्थक्षेत्र अरण येथे पालखी मार्ग कडे जाणाऱ्या चौकामध्ये एक कार व दोन मोटरसायकलचा अपघात होऊन तीन जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले आहेत मयता मध्ये एका महिलेचा समावेश असून दोन पुरुषांचा समावेश आहे. याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहीती असे की टेंभुर्णी पासून २२ किलोमीटर अंतरावरती असलेल्या संत सावता माळी यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या अरण गावा मधून पंढरपूर कडे जाणारा पालखी मार्ग आहे त्या चौकांमध्ये उल्हासनगर जिल्हा ठाणे येथून सोमलिंग रेवाप्पा उत्साही रा. सरदार निवास रूम नंबर 2 महबूबनगर, अमोल अपारमेंट, उल्हासनगर यांची महिंद्रा कंपनीची टी यु व्ही ३०० कार नंबर एम एच ०५ डी एच ७६ ४० यामधून हैदराबाद येथे सैन्यदलात सुभेदार या पदावरती नोकरीस असलेने बुधवारी दिनांक १८ रोजी कामावर रुजू होण्यासाठी निघाले असता अरण येथील पालखी मार्गाच्या चौकामध्ये ते आले असता हिरो डुएट स्कूटी एम एच१३ डीजे ७४९६ या गाडीला कट बसून विरुद्ध दिशेला येणाऱ्या म्हणजे सोलापूर कडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोटार सायकल हिरो होंडा पॅशन एम एच१३- ८८ ४३ या मोटर सायकलला जोराची धडक देऊन त्यावरील रज्जाक मुबारक कोरबू (वय३०) वर्ष, शकील गुलाब कोरबू (वय ५५) वर्ष रा. पेनुर तालुका मोहोळ हे जागीच मयत झाले असून अपघातग्रस्त कार रस्त्यामधील दुभाजकास धडकून उलटली त्यामधील प्रतिभा सोमलिंग उत्साही (वय४३) रा. सरदार निवास रूम नं २ महबूबनगर अमोल अपारमेंट जवळ उल्हासनगर ३ जि. ठाणे या जागीच मयत झाले असून आणखी एका मोटर सायकल होंडा शाइन एम एच १३ सीएम १०३७ या गाडीला धक्का बसून त्यावरील निवृत्ती देऊ दळवी (वय ४८) रा. कोंडी ता. उत्तर सोलापूर व शिवाजी नागनाथ शिंदे रा. कोंडी व स्कुटी वरील राजेंद्र तुकाराम रंदवे (वय ५५) वर्ष रा. पालवण ता. माढा व अरुण संपत्ती साळुंखे (वय ६०) वर्षे रा. पालवण हे जखमी झाले आहेत तर कारमधील राहुल सोमलिंग उत्साही (वय १७) वर्ष रा. सरदार निवास उल्हासनगर याचा पाय मोडला असून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केले आहे. असे ५ जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची खबर फिरोज शेख (वय ३०) वर्षे रा. जामगाव ता. माढा यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यांमध्ये दिली असून एकूण सर्व वाहनांचे एकूण नुकसान ३ लाख ३१ हजार रुपयाचे झाले असून टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, वाहतूक शाखेचे पडवळकर टोलनाक्यावरील मदत पथकाद्वारे पो.हे. काॅ. कांतीलाल माने पो.शि.शेख,पो.खंडागळे,पो.घोडके पो.गोरे हे अपघात स्थळी जाऊन जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने रवाना केले व आपघात ठिकाणी झालेली विष्कळीत वाहतुक सुरळीत केली या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत
अनिल भागवत जगताप मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर प्रतिनिधी