चाकण दि,१५ :- – स्कॉर्पिओ कार मधून आलेल्या चोरट्यांनी एटीएम कापून नेले. ही घटना आज, रविवारी (दि. १५) पहाटे दोनच्या सुमारास म्हाळुंगे येथील खराबवाडी येथे असणारे अॅक्सिक्स बँकेचे एटीएम सेंटरचे मशीन चोरट्यानी चोरून नेले आहे. १३ लाखांचा एवज लंपास केले आहे मिळालेल्या माहितीनुसार; खराबवाडी येथे अॅक्सिक्स बँकेचे एटीएम आहे.
त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतून चोरटे आले.व गाडी ला दोरी बांधून मशीन काढले आणि ते मशीन
स्कॉर्पिओ गाडीत टाकून पळ काढला.आहे
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण जवळील खराबवाडी औद्योगिक वसाहतीतील सारा सिटीच्या गेटशेजारील साई निवास बिल्डिंगमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी नेहमीच पैसे काढण्यासाठी लोकांची वर्दळ असते, त्यामुळे या एटीएम मशिनमध्ये लाखो रुपयांची रक्कम भरलेली असते. रविवारी रात्री १.३० ते २ च्या दरम्यान चोरट्यांनी विकानेर कंपनीचे अॅक्सिस बँकेचे संपूर्ण एटीएम मशिन कापून रोकडसह पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून चोरून नेले. या मशिनमध्ये १०० रुपयांच्या ३ नोटा, २०० रुपयांच्या ७४० नोटा, तर ५०० रुपयांच्या १६४८ असे ९ लाख ७२ हजार ३०० रुपये रोख तर ३ लाख ५० हजार रुपयांचे मशिन असा १३ लाखांचा एवज लंपास केला. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत.