पुणे, दि. १३ :- चिखली परिसरात देशी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणार्या इसमाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई कुदळवाडी, चिखली येथे रविवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास केली.सचिन बबुशा शेटे (वय 24, रा. शेटेवाडी, वाडा, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेटे हा रविवारी (दि.१२) रात्री साडेदहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे आला होता.त्यावेळी संशयावरून चौकशी केली असता त्याच्याकडे २५ हजार ५०० रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्तूल व एक जिवंत काडतुस आढळून आले. पिस्तूल काडतूस जप्त करून त्याला अटक करण्यात आली. व पुढील तपास चिखली पोलीस सपोनि पाटील करीत आहेत