पुणे दि १३ : – बारामती तालुका पोलिस स्टेशन,पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यास ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब भीमराव जाधव (५४) आणि पोलीस कर्मचारी अजिक्य लहू कदम (२८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.जाधव आणि कदम हे बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्या भावावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक पूर्व जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी दोघांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयांची लाच मागितली.केली होती व याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या कडे तक्रार केली होती.या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.व त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रविवारी रात्री पोलीस ठाण्याच्या परिसरात तडजोडी अंती ५० हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, व अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे