टेंभुर्णी दि १२ : – सोलापुर- पुणे महामार्गावर माढा तालुक्यातील अरण परिसरात झाडांना पाणी घालणाऱ्या टॅकरला पाठीमागून ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकचालक जागीच मयत झाला असून दोघेजण एकजण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८.४५ वा.घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापुर- पुणे या महामार्गावर अरण (ता.माढा) येथे रविवारी सकाळी रस्त्याच्या दुभाजकावरील झाडांना (एम.एच.३४.ए -६४६१)या टॅकरद्वारे चालक मनोहर लक्ष्मण ढेरे व कामगार विलास ताकतोडे हे पाणी घालत होते.यावेळी मुबंईवरून हैद्राबादच्या दिशेने मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅकने (क्र-एमएच ०४ जीआर ५१८७) रस्त्यावर उभ्या असलेल्या पाण्याच्या टॅकरला जोरदार धडक दिली.यात ट्रॅकमधील चालक अंनतराव तिपन्ना (वय ३३) वर्ष रा.रामपुरवाडी ता.बसवकल्याण. जि.बिदर हा गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला.तर क्लिनर उमेश तिपन्ना (वय-३३)बसकल्याण, जि.बिदर हा गंभीररित्या जखमी झाला.तसेच पाणी घालणारे ढेरे व ताकतोडे (वय-५५) हे किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी तातडीने महामार्ग पोलिस व सहा. पोलीस उपनिरीक्षक कांतीलाल माने व त्यांचे सहकारी कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारात हलवले.अधिक तपास कांतीलाल माने हे करीत आहेत
प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल जगताप