टेंभुर्णी[ दि१२ :- प्रतिनिधी टेंभुर्णी एम आय डी सी मध्ये जमीन खोदून मुरुमचा उपसा आनेकदिवसा पासुन राजरोसपणे केला जात आहे.गेली अनेक वर्षांपासून हा सर्व प्रकार सुरु असून याकडे महसूल प्रशासनाचा जाणून बुजून दुर्लक्ष आहे.मुरूम माफिया रोज नियमितपणे जेसीबीचे सह्यायने मुरुमचा उपसा करून ते मुरूम मोठ्या टिपर मध्ये भरून रात्रभर मुरुम उपसा करून जिल्ह्यात व जिल्ह्याचे बाहेर नेऊन विक्री करतात.शासनाचा कोट्यवधींचा गौण खनिजाची लूट टेंभुर्णी एम आय डी सी मध्ये सुरु असून ती तातडीने बंद करून संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी टेंभुर्णीचे सामाजिक कार्येकर्ते बशीर जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे.
मुरुम उपसा केल्याने एम आय डी सी मध्ये मोठे खड्डे पडलेले आहे.जागो जागी खुली जागा पोखरून त्या ठिकाणाहून मुरूम उपसा करण्यात आले आहे.गेली 8 ते 10 वर्षांपासून हा चोरीचा धंदा सुरु असून देखील प्रशासनाने एकदाही कारवाई केलेली नाही.या संपूर्ण प्रकरणामध्ये मुरुम माफियांबरोबर महसूल प्रशासन,एम आय डी सी चे काही अधिकारी,त्यांचे कर्मचारी या सर्वांचे संगनमताने हा गोरख धंदा राजरोसपणे सुरु असून रात्रभरात 70 ते 80 टिपर मुरूम भरून एम आय डी सीचे बाहेर पडत असल्याची माहिती जहागीरदार यांनी दिली आहे.
मुरूम उपशामुळे एम आय डी सी मध्ये 8 ते 10 फुटांचे खड्डे पडले आहे.त्या खड्यांमध्ये एम आय डी सी मधील केमिकल फॅक्टरीवाले त्या खड्ड्यांमध्ये मळीमिश्रित दुर्गंधीगुक्त सांडपाणी व स्पेन्तवाश टाकतात त्यामुळे त्यापूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.याविषयीची माहिती पाच ते सहा महिन्यांपूर्वी वॉट्स अँप वर फोटो सहित तक्रार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार माढा यांचेकडे केली होती परंतु या प्रकरणाची साधी दखल या अधिकाऱ्यांनी घेतली नाही.हि बाब गंभीर असल्याचे जहागीरदार यांनी म्हटले आहे.मुरुम माफिया यांचे भीतीने आजपर्यंत कुणी या विषयी तक्रार केलेली नाही ज्यांनी तक्रार केली त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली,तसेच अधिकारी हे मुरुम माफियांबरोबर शामिल असल्याने कारवाई करणार कोण हा प्रश्न तक्रारदारांना पडतो.सदर प्रकरणी माझ्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचे कोट्यवधींचे गौण खनिजची लूट तातडीने थांबवण्यात यावी व मुरूम माफियांवर व त्यांना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर्ती कारवाई करण्यात यावी.येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास टेंभुर्णी एम आय डी सी मध्ये मुरुम उपसा करून झालेले खड्ड्यात बसून आमरण उपोषण करणार असल्याची तक्रार बशीर जहागीरदार यांनी केली असून तक्रारीची प्रत मुख्य सचिव,महसूलमंत्री,विभागीय आयुक्त,अधीक्षक अभियंता पुणे, कार्यकारी अभियंता सांगली,प्रांत कुर्डुवाडी,व तहसीलदार माढा यांना पाठविण्यात आली आहे.
प्रतिनिधी मु.पो.टेंभुर्णी ता.माढा जि सोलापुर :- अनिल जगताप