मुंबई दि २२ : – घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता सेना आणि घाटकोपर वृत्तपत्र विक्रेता संघ यांनी संयुक्तपणे महापौर सौ किशोरी पेडणेकर यांची भेट घेवून वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिकृत परवाने द्या,अशी मागणी केली.यावेळी वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष प्रकाश वाणी,उपाध्यक्ष सचिन भांगे,कार्याध्यक्ष नितीन गंभीर,सेक्रेटरी प्रकाश गिलबिले,युनूस पटेल,दिपक पवार तसेच वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष नितीन रेणुसे,कार्याध्यक्ष दीपक गवळी,खजिनदार किशोर येवले आदी उपस्थित होते.ऊन,वारा,पाऊस कशाची देखील तमा न बाळगता लोकांसाठी वृत्तपत्र पोहचविण्यासाठी कार्यरत असलेला वृत्तपत्र विक्रेता हा दुवा आहे.काही वेळेला या विक्रेत्यांना रेल्वे,मनपा प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागते.या वृत्तपत्र विक्रेत्यांना होणारा त्रास थांबवा असे आदेश काही वर्षांपूर्वी महापौर नंदू साटम यांना स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. महापौर सौ किशोरी पेडणेकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला नक्की प्रयत्न करू असे आश्वासन दिले.संपूर्ण मुंबई मधील वृत्तपत्र विक्रेत्यांना अधिकृत परवाने द्यावे अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने करण्यात आली.
मुंबई प्रतिनिधी :- बाळू राऊत