पुणे दि २२ :- पुणे महापालिकेचे नवे आयुक्त शेखर गायकवाड यांनी बुधवारी सकाळी पदभार स्विकारला. आयुक्त सौरभ राव यांनी आपल्यापदाची सूत्रे गायकवाड यांच्याकडे सोपविली. “पुण्याच्या विकासाला प्राधान्य राहील,’ असे गायकवाड यांनी सांगितले.महापालिकेतील पावणेदोन वर्षांच्या कालावधीत राव यांची बदली होऊन, त्यांच्याजागी गायकवाड यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने मंगळवारी सायंकाळी काढला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गायकवाड यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला.