श्रीगोंदा दि २२ :- श्रीगोंदा शहरातील गुरुमाऊली झेरॉक्स सेंटर येथून फसवणूक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्या प्रकरणी ११ जानेवारी रोजी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरवत दिलीप शंकर शिंदे या खोट्या नावाने श्रीगोंदा येथे वास्तव्य करत असलेल्या भमट्यास पैठण जिल्हा औरंगाबाद येथून श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे स.पो.नि. सानप व त्यांच्या टीमने अटक करत त्याच्या कडून ४ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
श्रीगोंदा शहरातील गुरुमाऊली झेरॉक्स सेंटरचे मालक बापूसाहेब छगन शेळके यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या दुकानात दिलीप शंकर शिंदे या खोट्या नावाने काम करत असलेला प्रसाद राजधर फसले वय २४ वर्ष रा.यशवंतनगर ता.पैठण जि.औरंगाबाद याने
मित्राच्या स्कोडा गाडी मधून गुरुमाऊली झेरॉक्स सेंटरच्या दुकानामधून कॉम्प्युटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर,१ लाख रुपये रोख व हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटरसायकल असा ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ११ जानेवारी रोजी शेळके यांनी दाखल करताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दि.२१ जानेवारी रोजी गुन्ह्यातील आरोपीचे मूळ नाव व पत्ता मिळविण्यात श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप व पोलीस हेडकॉन्स्टेबल ढवळे यांना यश आले व त्यांनी तत्काळ प्रसाद राजधर फसले यास रा.यशवंतनगर ता.पैठण जि.औरंगाबाद येथून ताब्यात व घेऊन गुन्ह्यात वापरलेली स्कोडा गाडी क्रमांक एम.एच.०४.डी.डब्ल्यू ५५३४ या गाडी स ह सेंटर मधील चोरून नेलेले झेरॉक्स मशीन,कम्प्युटर,दोन नवीन मोबाईल, फॅशन प्रो मोटरसायकल असा 4 लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव,व पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप व पोलीस हेडकॉन्स्टेबल ढवळे, पो.कॉ. मांडगे, देवकाते, सुपेकर, काळे, सय्यद यांनी केली.
चौकट :
या आरोपीने अनेक जणांची फसवणूक केली असून त्याचा तपास चालू आहे. त्याच्यावर मुकुंदवाडी पोलीस ठाणे औरंगाबाद या ठिकाणी अशाच प्रकारचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा सराईत गुन्हेगार असून अशा प्रकारची फसवणूक झालेले अथवा चोरी झालेले असल्यास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे समक्ष येऊन अथवा फोनवरून माहिती देऊन कळवावे असे आवाहन श्रीगोंदा पोलिसांकडून यावेळी करण्यात आले.
श्रीगोंदा प्रतिनिधी : योगेश चंदन