पुणे २६: – पुण्यातील पाषाण तलावाच्या परिसरातील जुळी मुल आढळून आल्याने पाषाण परिसरात सर्वत्र खळबळ उडाली होती व नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली होती व जुळ्या मुलांच्या आई-वडिलांना शोधण्यात चतुःश्रृंगी पोलिसांना यश आलंय.आहे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये दि १४ रोजी पाषाण तलावाजवळ महादेव मंदिराकडे जाणाया रोडवर कचराकुंडी मध्ये कोणीतरी अज्ञात इसमाने दोन जिवंत जुळी नवजात बालके(अर्भके) एक स्त्री जातीचे व एक पुरुष जातीचे बालक उघडयावर सोडून त्यांना सांभाळण्यास असमर्थता
दाखवून निघून गेले होते व ससून रुग्णालयात त्यांची रवानगी करण्यात आली होती.अज्ञाताविरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता व पण, या मुलांचे आई-वडील कोण? असा प्रश्न उपस्थित झाला होता.असा प्रश्न उपस्थित झाला होता. मुलांच्या आई-वडिलांना शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा कामाला लागली होती. आठ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना बाळांच्या आई-वडिलांना पकडण्यात यश आलं दाखल गुन्हयाचा वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी असे तपास करीत असतानापोलिसांनी असा घेतला शोध पाषाण तलावाजवळ सापडलेल्या दोन जुळ्या मुलांमुळे पोलिसांचे ह्दयही हेलावले. त्यातूनच पोलिसांनी पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या आई-वडिलाचा शोध घेण्याचे ठरविले. प्रारंभी शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला, याचा पोलिसांनी शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानुसार, वाकड, हिंजवडी, वडगाव, कात्रज या परिसरातील रुग्णालयांमध्ये शोध घेतला. त्या वेळी पुणे शहरातील हॉस्पीटल भेट देवुन माहिती घेत असताना जननी नर्सग होम कर्वेनगर पुणे येथे माहिती प्राप्त झाली की, दि १३ रोजी एका इसमाने महिला ही डिलेव्हरी साठी दिनांक १३ रोजी रात्रौ १.०० वा.चे सुमारास अॅडमिट केले व तिची पहाटे ४.१० वा.डिलेव्हरीझाली असता तिला एक मुलगा व एक मुलगी झाली व सदर इसम व महिला ही दिनांक १४ रोजी हॉस्पीटल मध्ये कोणास काही एक न सांगता दोन्ही मुलांना घेवून निघून गेल्याची माहिती प्राप्त झालेने सदर महिलेवर संशय बळावलेने तिचा वर दिले पत्यावर पोलिसांनी शोध घेतला असता सदरची महिला मागील एक वर्षापासुन तेथे राहत नसल्याचे समजले. तद्नंतर सदर महिलेचा शोध घेत असताना मोबाईल लोकेशन व अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे व पोलीस नाईक प्रकाश आव्हाड, व सचिन कांबळे, यांना मिळालेल्या बातमीवरून व पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मुळे,यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून सदर महिला ही वडगांव ब्रदुक भागात राहत असल्याची खात्रीशीर
माहिती मिळाल्याने सदर माहिती वरून मा.अप्पर पोलीस आयुक्त,श्री सुनिल फुलारी,पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,मा.पोलीस उप आयुक्त,श्री पंकज देशमुख, परिमंडळ ४ पुणे शहर,मा.सहा.पोलीस आयुक्त,श्री लक्ष्मण बोराडे,खडकी विभाग पुणे शहर यांना देवून त्यांनी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीमती माया देवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक
मोहन जाधव, राकेश सरडे, कर्मचारी पो.हवा. एकनाथ जोशी, पोलीस हवा.मुकुंद तारू,मारुती पारधी,पोना प्रकाश आव्हाड, संतोष जाधव,सचिन गायकवाड,सचिन कांबळे,सारस साळवी,ज्ञानेश्वर मुळे,निकीप राठोड,तेजस चोपडे, मपो.ना. ६११५ केंगले,व पोलीस हवा विकास शिंदे,परिमंडळ-४ पुणे शहर,बाला शेख,वारजे पो.स्टे यांचे टिम ने सदर महिला व इसम नामे संतोष नागनाथ वाघमारे वय ३० वर्षे रा. रा.शिवाजी पुतळयाचे समोर,ढमाळ चाळ,घुले नगर, वडगांव बुद्रक ता.हवेली,जि.पुणे .मुळगांव- शिवाजी चौक,तुळजापुर ता.तुळजापुर, जि.उस्मानाबाद यांना वडगावं येथून ताब्यात घेवून त्यांचेकडे दाखल गुन्हयामध्ये पाषाण तलाव पुणे येथे मिळून आलेल्या एक दिवसांचा एक मुलगा व एक मुलगी याबाबत
विचारपुस करता त्यांनी गुन्हयाची कबुली देवुन सांगितले प्रेमसंबंधातून जुळ्या बाळांचा जन्म झाला होता. त्यांना बाळाला सांभाळायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी दोन्ही जुळ्या मुलांना तलावाच्याकडेला फेकून दिले. व सदर मुलांचा जन्म दिनांक १३ रात्रौ पहाटे ४.१० वा.चे सुमारास जननी नर्सिंग होम कर्वेनगर पुणे येथे झालेचे सांगुन याअगोर सदर महिलेस पहिल्या पती पासुन तीन मुली असुन आता जन्म झालेल्या मुलांचा संभाळ करण्याची त्यांची परिस्थिती नसल्याने मुलांचा सांभाळ करू शकत नसले
कारणाने सदर मुलांना पाषाण तलाव उदयान जवळ येथे रस्त्याचे कडेला कचरा कुंडीजवळ दि १४ रोजी सकाळी ७.३० वा.चे सुमारास सोडून दिलेचे सांगितले तसेच यातील आरोपी क्रमांक-२
संतोष नागनाथ वाघमारे,याचे विरुध्द वारजेमाळवाडी पो. स्टे. गु. रजि. नं. २६/२००८ भा. द. वि. कलम ३०२, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर अपत्यांचे माता पिता तेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यांना दाखल गुन्हयाचेकामी अटक करण्यात आली आहे.नमद अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा शोध घेवून पुणे चतुर्श्रुंगी पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आहे. व पुणे शहरात चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशनची पुणे शहरात कामगिरीबद्दल कौतुक होत आहे