निरा नरसिंहपुर दि, २६ :- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडके दादा विद्यालयामध्ये 71 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला माजी चेअरमन व प्रगतशील बागायतदार लालासाहेब शिवाजी बोडके पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले तसेच ग्रामपंचायत पिंपरी बुद्रुक या ठिकाणी माजी सैनिक बळीराम कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला लोकनेते महादेवराव बोडके दादा यांच्या पुतळ्याचे पूजन प्रगतशील बागायतदार रामचंद्र भगवान लावंड यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी शपथही सर्व पालकांना सही व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक लवटे सर यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आली प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील बागायतदार प्रभाकर बोडके पाटील होते यावेळी विविध कला गुन दर्शन कार्यक्रम व कवायती विद्यार्थ्यांचे कडून करण्यात आल्या निरा नरसिंहपुर तनु गिरवी आडोबा वस्ती चव्हाण वस्ती पिंपरी बुद्रुक ओझरे गोंदी लुमेवाडी गणेश वाडी सराटी या सर्वच भागांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
नंतर विद्यार्थी व ग्रामस्थांच्या वतीने ही
आपले मनोगत प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आले या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त माजी सरपंच श्रीकांत बोडके पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये चांगले विचार घेतले पाहिजेत अभ्यासामध्ये चांगले लक्ष देणे गरजेचे पर्यावरणाविषयी झाडे लावा झाडे जगवा एक संकल्पना विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी यावेळी पिंपरी गावचे विद्यमान सरपंच आबासाहेब बोडके उपसरपंच जाहीराबी शेख अनंता बोडके
लालासाहेब बोडके प्रभाकर बोडके सुनील बोडके संचालक संजय बोडके प्रवीण बोडके बाळासाहेब घाडगे समाधान बोडके अशोक बोडके वर्धमान बोडके संतोष सुतार दादा भाई शेख राहुल शिंदे नामदेव बोडके हनुमंत पडळकर जगो मामा रमेश मगर संदीप बोडके बहु रंधवे विलास नरोटे मारुती सुतार पिंपरी बुद्रुक मधील सर्व ग्रामस्थ व पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी भाऊसाहेब प्राथमिक आरोग्य अधिकारी केंद्रप्रमुख सर्व शिक्षक शिक्षिका अंगणवाडीसेविका मदतनीस उपस्थित राहून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
निरा नरसिंहपुर तालुका :- प्रतिनिधी बाळासाहेब सुतार