पुणे दि २७ :- गेले काही महिन्यापूर्वी गडचिरोली येथून बदली झाल्यानंतर (डीवायएसपी) पोलीस उपअधीक्षक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी भोर विभाग येथे बदली झाली. महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये समाधानकारक सेवा ,कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष पुरस्कार पोलीस यंत्रणेकडुन सन्मान केला जातो. या प्रमाणे सासवड येथील ( डिवायएसपी ) पोलीस उपअधिक्षक अण्णासाहेब मारुती जाधव यांनी गडचिरोली येथे पोलीस आणि जनता यांच्यामधील संबंध सुधारणे, सामाजिक उपक्रमात सहभाग , नक्षलविरोधी कारवाईत सहभाग यासह अन्य उपक्रमात जाधव यांनी घेतला.त्याबद्ल नुकतेच विशेष सेवा पदक पुरस्कार नुकताच जाधव यांना जाहीर झाला आहे. हा विशेष सेवा पदक पुरस्कार पुणे येथील पोलीस अधिक्षक कार्यालय पाषाण या ठिकाणे २६ जानेवारी प्रजासत्तक दिनाच्या कार्यक्रम वेळी दिला गेला .या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री,व पोलीस आयुक्त, उपायुक्त ,पोलीस अधीक्षक ,उपाध्यक्ष सह या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बांधव उपस्थित राहणार आहेत.जाधव यांना विशेष सेवा पदक पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.