पुणे दि २७ :- पुणे चतुर्श्रुंगी परिसरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करून जीव मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सिम्बॉयसिस इन्स्टिट्युटच्या शेजारी फिरोदिया पथ येथे असलेल्या चहाच्या टपरीवर मॉडेल कॉलनी पुणे येथे घडली. गणेश उर्फ सुरज अशोक वड्डे वय २२ रा मंगळवार पेठ असे जखमीचे नाव आहे. गणेश उर्फ सुरज सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अधिक माहिती अशी की,
यातील फिर्यादी हे त्यांच्या मित्र १) गणेश वड्डे, २)चेतन जाधव,३) चेतन शिंदे,४) अभिजीत यमकर,५) आकाश जाधव, तसेच इतरांबरोबर क्रिकेट खेळून झाल्यानंतर चहा पिण्यासाठी गेले असताना जुन्या भांडणाच्या वचपा काढण्याच्या उद्देशाने यातील नमूद आरोपी यांनी कोयत्या सारख्या हत्याराने फिर्यादी यांच्यासोबत असलेले गणेश उर्फ सुरज अशोक वड्डे यांच्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे व पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे, माया देवरे करीत आहे