पुणे दि २८ :- पुणे ससून रुग्णालयाला सायबेज आशा फाऊंडेशनकडून ससूनला अत्याधुनिक पोर्टेबल ट्रडीइको ची देणगी स्वरूपात भेट देण्यात आली आहे . टूडीइको उपकरण – हदयाच्या सोनोग्राफीसाठी उपयुक्त आहे . तसेच कलर डॉपलरच्या माध्यमातून – हदयाची कार्यक्षमता या उपकरणावर समजते . – हदयाच्या झडपा त्यांची रचना व आजाराचे निदानही समजते . तसेच यकृत प्रत्यारोपणात हे उपकरण उपयुक्त आहे . तसेच २ सीआर्म मशिन ही देणगी स्वरुपात भेट दिले . अस्थिव्यंगोपचारशास्त्र व युरॉलॉजी शस्त्रक्रियांमध्ये सीआर्म मशीन उपयुक्त आहे . तसेच बॅटरीवर चालणारी ३ वाहने भेट देण्यात आली . ही वाहने ससून रुग्णालयात लॉन्ड्री , लिनन व कचरा गोळा करण्यासाठी उपयुक्त आहेत . या सर्व वैद्यकीय साहित्ये ही रु . ४१ लाख किमतीची आहेत . या उपकरणाचा लोकार्पण सोहळा श्रीयुत नवनाथ जगताप , उपधर्मादाय आयुक्त पुणे यांच्या शुभहस्ते दि .२७ जानेवारी , २०२० रोजी संपन्न झाला प्रभारी अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी या देणगीबद्दल सायबेज आशा फाऊंडेशनचे आभार मानले . यावेळी सायबेजच्या संचालिका डॉ . रित नाथाणी हया म्हणाल्या की , ससून सर्वोपचार रुग्णालय ही संस्था पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांच्या आरोग्य विषयक गरजांची पुर्तता करत आहे . ससूनच्या गरजा ओळखून आम्ही ही देणगी दिली आहे . नवीन पोर्टेबल टूडीइको ही मशिन उच्चकौशल्यपूर्ण डॉक्टरांना यकृत प्रत्यारोपणात उपयुक्त ठरणार आहे . तसेच रुग्णांच्या – हदयाचे योग्य निदान करण्यास मदत होणार आहे . डॉ . अजय चंदनवाले , सहसंचालक , वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई तथा अधिष्ठाता बै जी . शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय , पुणे हे म्हणाले की , ससन हे सामान्य जनतेचे आशास्थान आहे . सायबेज आशाने ससूनला दान केलेल्या हया अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांमुळे रुग्णांना चांगली सेवा देण्यात हातभार लागणार आहे . सायबेज आशाचे अनुकरण इतर सेवाभावी संस्थानी करावे . ससूनला देणगी देण्यासाठी सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घ्यावा . ससूनला दिलेल्या देणगीवर ८० जी आयकर सवलत उपलब्ध आहे . या कार्यक्रमाला ससूनचे डॉ . रमेश भोसले , डॉ . श्रीनिवास शिंत्रे , डॉ . रोहिदास बोरसे , डॉ अजय तावरे , डॉ . सुरेश पाटणकर , डॉ . विजय जाधव , डॉ . सोमनाथ सलगर व डॉ . हरीष टाटिया हे उपस्थित होते .
पुणे प्रतिनिधी :- संकेत काळे