पुणे दि ३० :- पुणे शहर येरवडा पोलीसांनी गरीब महिलेला केली मदत दि २८ रोजी सकाळी ११ : ०० वा . चे सुमरास एक महिला शास्त्रीनगर चौक , पुणे नगर रोडचे कडेला फुटपाथवर रडत बसलेली असल्याचे बंदोबस्तावरील पो . उप . निरी विठ्ठल माने यांना दिसली . पो . उप . निरी . माने यांनी त्या महिलेकडे
विचारपूस केली असता त्या महिलेनी सांगितले कि मी भाजी घेण्यासाठी येरवडा येथे आली होती व तिला परत तिच्या घरी चंदननगर येथे तिच्या घरी जाण्यासाठी तिच्याकडे पैसे नसल्याने तसेच कोणतेही वाहन मिळत नसल्याचे तिने सांगितले . त्यावेळी पो . उप . निरी . माने यांनी सदर महिलेस पिण्याचे पाणी व बिस्कीटचे पुडे देऊन सदर महिलेस चंदननगर येथील स्थानिक भाजीपाला वाहतूक करणारे खाजगी वाहनातून तिला चंदननगर येथे पाठवून सदर महिलेस मदत केली आहे .