पुणे दि 31 : – अल्पवयीन मुलीस प्रेमाचे आमिषातून तिचे शारीरीक शोषण करून मुळ गावी सोडण्याचा बहाणा करून भिगवण रेल्वे स्टेशन परिसरात खुनाचा प्रयत्न करणारे स्थानिक गुन्हे शाखेने केले आरोपीस गजाआड ” भिगवण पोलीस स्टेशन हददीत भिगवण रेल्वे स्टेशन परिसराचे नजिक असणारे दत्तात्रय कुंडलीक गायकवाड यांचे मक्याचे शेतात दि १९ रोजी १०:०० वा . चे सुमारास एक अनोळखी मुलगी वय अंदाजे १४ ते १५ वर्षे वयोगटातील ही बेशुध्दावस्थेतपोलिसांना मिळून आली होती तिचे गळयावर वार केलेले होते , डोक्यात दगडाने गंभीर जखम झाली होती त्याबाबत भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता . सदर गुन्हयातील जखमी मुलीची ओळख पटलेली नव्हती व ती बोलण्याचे स्थितीत नसल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पुणे ग्रामीण पोलीस दलासमोर होते . सदरचा गुन्हा हा अल्पवयीन मुलीचे खुनाचे प्रयत्नाचा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हयाचे समांतर तपासाकरीता मा . पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना व उप विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांनी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा , पुणे ग्रामीण यांना आदेशीत केलेले होते . त्याप्रमाणे भिगवण पो . स्टे . येथील स . पो . नि. माने व त्यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील सहा . पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , पो . ना . विजय कांचन , पो . ना . लियाकतअली मुजावर , पो . ना . चंद्रकांत जाधव , पो . ना . राजू मोमीन , पो . कॉ . धिरज जाधव व अक्षय जावळे यांचे पथक गोपनीय माहीती व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपींचा शोध घेत होते . सदर गुन्हयातील जखमी अनोळखी मुलगी हि जखमी अवस्थेत असताना तिचेकडून संशयीताचा मोबाईल नंबर प्राप्त झाला होता त्यानुसार तांत्रीक विश्लेषणाचे आधारे व गोपनीय बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अनिल संतलाल साहु , वय १९ वर्षे , रा . नगुरदेवा , रामपुर , जि . सिध्दी , राज्य मध्यप्रदेश यास लोणावळा येथून ताब्यात घेतले व त्याचेकडे केले तपासात निष्पन्न झाले की , त्याचा मित्र राकेश सुरज साह , वय २४ वर्षे याचे जखमी मुलीसोबत प्रेमसंबंध होते व त्याने जखमी मुलीस तिचे मुळ गावातून लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणले व तिचे शारीरीक शोषण केले त्यात ती गर्भवती राहीली होती , परंतु मुळ गावी पोलीस तक्रार दाखल झाल्याचे समजल्यामुळे अनिल संतलाल साहु याने राकेश सुरज साहयाचेशी जखमी मुलीस ठार मारण्याचा कट केला व त्या कटाप्रमाणे अनिल संतलाल साहु याने जखमी मुलीस मुळ गावी पाठविण्याचा बहाना करून राकेश सुरज साहु याचे सांगण्यावरून भिगवण येथील मक्याचे रानात नेवून तिचे गळयावर ब्लेडने वार केले व डोक्यात दगड मारून , गळा आवळून तिचा खुन करण्याचा प्रयत्न केला असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झालेले आहे परंतु जखमी मुलगी ही बेशुध्द पडल्याने अनिल साहु याने ती मृत झाल्याचे समजून तेथून पळ काढला होता . जखमी मुलीवर अद्याप ससून हॉस्पीटल , पुणे येथे उपचार चालू असून गुन्हयाचा पुढील तपास स . पो . नि . जीवन माने , भिगवण पो . स्टे . हे करीत आहेत . कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावलेला असताना बंदोबस्त सांभाळत सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याची मोठी जबाबदारी पुणे ग्रामीण पोलीस दलावर होती त्यातूनही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने तपास करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक साो . , पुणे ग्रामीण यांनी तपास पथकास रोख बक्षीस जाहीर केलेले आहे .