पुणे ग्रामीण दि १५ :- तेलंगणा ते मुंबई अत्यावश्यक सेवाचे टेम्पोच्या काचावर स्टिकर लावून गुटख्याची वाहतूक करत असताना प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक करत वाहतुक करत असताना मिळून आल्याने फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल..22 लाख 27 हजार रुपयांचा गुटख्यासह एकुण 32 लाख 27 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त अपर पोलीस अधीक्षक यांचे सूचनेनुसार कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने अपर
पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि पोलीस जवान हे पेट्रोलिंग करत असताना वाहने चेकिंग दरम्यान Eicher टेम्पो च्या हालचालीबाबत संशय आल्याने सदर टेम्पोच्या पाटस टोल नाक्यापर्यंत हालचालींवर लक्ष ठेऊन पाटस टोल नाका येथे ताब्यात पोलिसांनी घेऊन विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना दिली. सदर गाडीत बिस्किटे आहेत असे टेम्पो चालकाला सांगितले त्यास अधिक विचारपूस करून टेम्पो चेक केला असता टेम्पो मध्ये कोणाही चेकिंग करणाऱ्या पोलिसांच्या लक्षात येऊ नये अशा पद्धतीने आतील बाजूस गुटख्याची पोती भरून मागचे बाजूला बिस्कीट चे box भरलेले पोलिसांना मिळून आले.सिकंदराबाद, तेलंगणा येथून पुण्याच्या दिशेने Eicher टेम्पो निघाला होता.सदर टेम्पोच्या काचेवर अत्यावश्यक सेवा असा छापील बोर्ड लावला होता.सदरचे वाहन हे तेलंगणा येथून 540 km प्रवास करून आले. या कालावधी दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवणूक करून एवढे मोठे अंतर पार करून आले.सदर आरोपींनी सदर वाहनाचा शासनाचा online pass सुद्धा प्राप्त करून घेतला होता.सदरची कारवाई दि 14. ते 15. च्या रात्र दरम्यान करण्यात आली..आरोपी-1)मानसिंग खुदहरणसिंग कुशवाहा वय 50 राहणार गाझीपुर उत्तर प्रदेश2) शीलदेव कृष्ण रेड्डी राहणार सिकंदराबाद, हैदराबाद राज्य तेलंगणा गाडी नंबरTS10 UA 6081 Pack body, Eicher मुद्देमाल-1) 22,27,500 रुपये किमतीचा सागर SGR – 2000 नावाचा गुटखा 2)10 लाख रुपये किमतीची Eicher टेम्पो विटकरी कलर गाडी नंबर TS10/UA6081 Pack body,एकूण 32,27,500 रुपये किमतीचा सदर आरोपींविरोधातअन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 व त्याखालील नियम 2011 अंतर्गत साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 कलम 2,3,4 या प्रमाणे *यवत पोलीस स्टेशन* येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी संदीप पाटील सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.जयंत मीना सो, (आयपीएस) अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,यवत पो स्टे चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,बारामती क्राईम ब्रँच चे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे, चालक रमेश मोरे तसेच यवत पो स्टे चे Psi सोमनाथ वाघमोडे, रामदास घाडगे पोलिस जवान संपत खबाले, रमेश कदम, जितेंद्र पानसरे, अजित काळे, प्रशांत कर्णवर यांनी केली. पुढील तपास PI भाऊसाहेब पाटील यांचे मार्गदर्शनाखाली PSI सोमनाथ वाघमोडे करत आहेत.