नीरा नरसिंहपूर दि 26 :-,गोर गरिबांचा कैवारी व दयाळू अन्नदाता मा. पुणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण भैय्या माने साहेब व सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव व बोराटवाडी या गावात, प्रविण भैया माने यांच्याहस्ते १६० अन्नधान्याचे किट वाटण्यात आले. मा. सभापती प्रवीण भैय्या माने अन्नधान्याचे किट वाटप प्रसंगी बोलत असताना ते पुढे म्हणाले की माझ्या इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेची अन्नधान्यापासून उपासमार होऊ देणार नाही जेवढे माझ्याकडून सहकार्य करता येईल तेवढे माझ्या वतीने केले जाईल तालुक्यातील जनतेचे प्रेम आमच्या नेहमीच परिवारावर आहे असेही यावेळेस ते म्हणाले.
समाजसेवेचे अखंड व्रत स्वीकारलेल्या व नागरिकांना सामोऱ्या येणाऱ्या प्रत्येक अडचणींत त्यांच्यासोबत सदैव उभे राहत आपलं सोनाई प्रतिष्ठान सदैव कार्यरत असते, जागतीक आपत्ती ठरलेल्या कोरोना सारख्या महामारीच्या प्रादुर्भावातही आपले समाज सेवेचे व्रत प्रतिष्ठानने जोपासले आहे.
देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मनुष्याच्या जीविताच्या दृष्टीने हा निर्णय सदैव योग्यच आहे, परंतु श्रमजीवी बांधवांचा अर्थिक कणा मात्र यामुळे डळमळीत झाला आहे. व अश्या साऱ्या समाज बांधवांना मदत म्हणून आपल्या इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव या गावी नागरिकांना अन्नधान्याच्या ८० तर बोराटवाडीमध्ये ८० किटचे प्रविण माने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
वाटप करण्यात आलेल्या अन्नधान्याच्या किटचा लाभ 40 ते 45 हजार नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या या अन्नधान्य किट मध्ये गहू, तांदुळ, साखर, डाळ अश्या वस्तू देण्यात आल्या असून अश्या पद्धतीचे सबंध इंदापूर तालुक्यासाठी तब्बल 10000/- किट बनवून गावोगाव गरजू कुटुंबापर्यंत पोहचविन्यात आले असल्याचे यावेळी प्रविण माने यांनी सांगितले.अन्नधान्याचे किट मिळाल्यानंतर तालुक्यातील गोरगरीब जनतेने मा. सभापती प्रवीण भैय्या माने यांचे कौतुक करून आभारही मानले.
निरा प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार