टेंभुर्णी दि ०६ : [प्रतिनिधी ]. पुणे मुंबई नंतर सोलापुर शहरात कोरोनाने धुमाकुळ घातला असताना गेल्या आठवड्यात मोहोळ ,सांगोला ,येते रुग्ण आढळून आले होते त्या नंतर आज माळशिरस तालूक्यातील आकलुज -सांगोंला रोडवर असलेले
मौजे कोळेगाव येथे कोरोना संक्रमीत रुग्ण आढळून आला असल्याने आकलुज आरोग्य विभागाकङून घटनास्थळी तातङीने खबरदारीच्या उपाय योजना सुरु झाल्या आहेत.
कोळेगाव येथील दुपङे वस्तीमधील एका व्यक्तीचा स्वॕब तपासणीसाठी सोलापूर येथील श्री छञपति शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पाठवला असता सदर व्यक्ती कोरोना संक्रमीत असल्याचा अहवाल रुग्नालयाने दिला. सदर अहलाल प्राप्ता होताच माळशिरस आरोग्य विभागाने या व्यक्तीस तत्काळ श्री छञपती रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर संक्रमित व्यक्तीने कोळेगाव परिसरात प्रवास केलेला आहे. त्यामुळे या परिसरात विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंञणासाठी व प्रतीबंधात्मक उपाय योजनेसाठी दुपङेवस्ती परीसर केन्द्रस्थानी धरुन ७०० मिटरचा परिसर प्रतिबंधीत परिसर म्हणुन व दुपङे वस्ती पासुन ५ किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हनुन जाहीर करण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रांताधीकारी शमा पवार, तहसिलदार अभिजित जाधव यांनी काल दि. ५ रोजी अकलुज ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन माळशिरस तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्ण नसल्यामुळे येथील नागरिक काहीही निमित्त काढुन रस्त्यावर फिरत होते. आज रुग्ण आढळुन आल्याचे जाहीर होताच तालुक्याचे वातावरण झपाट्याने बदलले आहे. रुग्ण आढळुन आल्यामुळे तालुक्याचे लाॕकङाऊन वाढणार हे आता निश्चित झाले आसुन या रुग्णामुळे माळशिरस तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप