पुणे दि ०७ :- पुणे चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दितील जनवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. दारू पिऊन आलेल्या तिघांनी ही तोडफोड केल्याचे स्थानिक रहिवाशी यांचे म्हणणे आहे.या प्रकरणी शामू लक्ष्मण धोत्रे (वय ४२, रा. जनवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयान इनामदार व त्याच्या दोन साथीदारांवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची पॅगो रिक्षा जनवाडीतील मॅफको कंपनीजवळ रस्त्यावर उभी केली होती. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आलेल्या आरोपींनी त्यांची रिक्षा व इतर कार अशा चार वाहनांच्या काचा फोडल्या.त्यानंतर तेथून पसार झाले. आरोपींनी मद्यपान केल्याचे माहिती स्थानिक रहिवाशी यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी आरोपीचा शोध सुरू आहे