उस्मानाबाद दि ०१ :- प्रतिनिधी सध्या कोरोना व लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असली तरी अवैध रित्या मटका, जुगार, गांजा विक्री, खासगी सावकारी अशा अवैध धंद्याना शहरात ऊत आला आहे.तर पोलिस प्रशासन मात्र डोळे बंद करुन बसल्याचे दिसत आहे..शहरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांना अटकाव करण्यास पोलिस प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे.कळंब शहरात अवैध धंदे सुरू असताना पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असल्याची चर्चा सध्या कळंब शहरासह संपूर्ण तालुक्यात सुरू आहे..कळंब तालुक्यात व शहरात अवैध धंदे बोकाळले आहेत.कळंब शहरात खुलेआम मटका घेतला जात असताना पोलिस प्रशासन मात्र मटका बंद असल्याची वल्गना करत आहे. मटक्याप्रमाणे जुगार, बेटिंग, गांजा विक्री असे सर्रास काळे धंदे जोमात सुरू आहेत. अशा धंद्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने शहराच्या गल्लीबोळात खुलेआम हे व्यवसाय सुरू आहेत.मटक्यासारख्या व्यवसायात असणाऱ्या काळ्या धंदेवाल्यांना राजकीय वरदहस्तही मिळत आहे. त्यामुळे शहरात दिवसेंदिवस अवैध व्यवसायांना बळकटी मिळत असून अनेकांनी आपले साम्राज्य उभा केले आहे. यातूनच आता तरी पोलिसांचे हात अवैध धंदेवाल्यांपर्यंत पोहचणार का?वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार का??असा प्रश्न विचारला जात आहे..
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:- इम्रान मुल्ला