पुणे दि.०१ :- प्रतिनिधी संजय गांधी नगर पाषाण पुणे येथे “डाॅक्टर आपल्या दारी” हि योजना कार्यान्वित केल्याची माहिती कु.शुभम वसंत भुजबळ (अध्यक्ष अखिल संजय गांधी नगर मित्र मंडळ) व सचिन मानवतकर यांनी दिली.कोरोनाचा वाढता प्रभाव
पाहता तसेच आपल्या आजुबाजुच्या परीसरात कोरोनानी शिरकाव करु नये म्हणुन मा. नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने राष्ट्रिय स्वयंमसेवक संघ जनकल्याण समिती व पुणे महानगरपालिका यांचा सहकार्याने पाषाण परिसरात व आजुबाजुच्या वस्ती भागात मेडीकल कॅम्प घेण्यात आला या
मध्ये खोकला, सर्दी, ताप, घसा दुखी व इतर आजार यांच्या तपासण्या करण्यात आल्या व त्यावर औषध उपचार करण्यात आले.तसेच संजय गांधी नगर परीसरातील सुमारे ३०० नागरीकाचे रोज मोफत आरोग्य तपासणी. सुरक्षित अंतर ठेवुन (Social Distacing) व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी
डाॅक्टरांच्या सल्ल्यानी औषध वाटप व उपचार करण्यात आले. दि.३० मे २०२० ते १ जुन २०२० पर्यन्त तपासणी केंद्र चालविण्यात येणार असल्याचे मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी आमच्या प्रतिनिधी यांना सांगितले आहे. तसेच या कार्यात शुभम भुजबळ, सचिन मानवतकर, राजाभाऊ सुतार,अरुण चव्हाण, लहु खेतावत, मिना हजारे, पिंकी मिसाळ व विनीता सरतापे यांचे योगदान लाभले
पुणे प्रतिनिधी :-संकेत संतोष काळे