वैजापूर दि २२ : – वैजापूर तालुक्यातील शिऊर ग्रामपंचायत ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. जगावर आलेल्या कोरोना च्या महामारी मध्ये सरपंच नितीन चुडीवाल यांनी गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या परीवारा प्रमाणे गावाची काळजी घेत वाटेल त्या ठिकाणी गोर गरिबांना मदत केली. तसेच गावातील सफाई कामगार यांना प्रोत्साहन देत गावाची काळजी घेतली.शिऊर गावाची कोरोना स्थिती एकुण रुग संख्या २७ असुन ७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. शिऊर पोलीस ठाणे २ रुग्ण, शिक्षण कॉलनी ४ रुग, शादीखाना परिसर ११ रुग्ण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर १ रुग्ण असुन एकुण रुग्ण संख्या १८ असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.शिऊर गावाचे सरपंच नितीन चुडीवाल हे स्वतः एक प्रसिद्ध व्यापारी असून देखील आपल्या व्यवसायाची काळजी न करता रात्रं दिवस गावासाठी आरोग्य विभागला सोबत घेऊन काम करत आहे तसेच आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका, यांना ग्रामपंचायत च्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधी मधून प्रोत्साहन निधी देखील मिळवुन दिला. वाटेल ती उपाय योजना आखली परंतु राज्य सरकार ने लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्याने गावांमध्ये शहरां मधुन वर्दळ वाढली आहे त्यामुळे आता कोरोनाचा अखेर प्रसार सुरू झाला आहे. त्यामुळे आता नागरिकांनी आपली काळजी घ्यावी अशी तीव्र इच्छा सरपंच नितीन चुडीवाल यांनी केली आहे.शिऊर गावाचे सरपंच
गेल्या काही दिवसांपासुन गावामध्ये कठोर परिश्रम घेत असुन देखील आज शिऊर गावाला कोनोराची नजर लागली आहे. आम्ही सर्व गावकरी या लढ्याला यशस्वी पने जिंकु तसेच गावामध्ये पुर्ण पने लॉकडाऊन केले असुन सर्व शासकीय सहकारी, व्यापारी, गावकऱ्यांनी सहकार्य करत असुन या पुढेही करत राहणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
वैजापुर तालुका प्रतिनिधी :- गणेश सिताराम ढेंबरे.