वैजापुर दि २३ :-वैजापुर तालुक्यात मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने कपाशी, मका, उस या पिकांना युरिया खताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. शेतकरी युरिया खताच्या प्रतिक्षेत असल्याने वैजापुर तालुक्यातील कृषी केंद्रावर युरिया खत घेण्यासाठी नियमांचे पालन करुन रांगेत उभे राहून युरिया खताची मागणी करत आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेला वैजापुर तालुका असल्याने या ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात पिके घेतली जातात. तसेच या ठिकाणी युरिया खताचा साठा उपलब्ध नसल्याने शेतकरी वर्गाला युरिया खताची टंचाई भासत आहे.दिवसभर भर उन्हात शासनाच्या नियमांचे पालन करुन रांगेत उभे राहून देखील युरिया खत मिळत नसल्याने शेतकरी वर्गाने तिव्र संताप व्यक्त केला आहे. जरी युरिया खत मिळाले तरी 2 / 3 /4 गोण्या मिळत असल्याने युरिया खत शेतीसाठी मुबलक प्रमाणात नसल्याने पिकांना फटका बसू शकतो. जसे तंबाखू, गुटखा, दारुचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे तसाच युरिया खताचा पुरवठा करण्यात यावा अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. याकडे कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी लक्ष केंद्रित करावे व दाबुन ठेवलेल्या युरिया खताची चौकशी करण्यात यावी व वेळीच विक्री करण्यात यावी. पाठपुरावा करून युरिया खताची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वैजापुर प्रतिनिधि :- गणेश ढेंबरे