पुणे दि. 19: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील विविध कामांचा, केंद्रीय मनरेगा संचालक राघवेंद्र प्रतापसिंग यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती थोरात उपस्थित होते.
‘सीक्युर’ अर्थात हमी योजनेतील कामांवर देखरेख ठेवण्यात येते. या प्रणालीच्या प्रभावी वापरासोबतच जिल्हयातील तालुक्यांतील मनरेगा कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. यामध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजूरांची उपस्थिती, मजूरांचा आधार क्रमांक संलग्न करणे, आधार क्रमांक आधारीत मजूरांना प्रदान करण्यात येणारी मजूरीसॉफ्टवेअर फॉर इस्टीमेट कॅल्क्युलेशन युसींग रुरल रेट ऑफ एम्प्लॉयमेंट प्रणालीमार्फत रोजगार, पूर्ण केलेल्या कामांची टक्केवारी, जॉब कार्डची तपासणी, मनरेगा अंतर्गत अपूर्ण सिंचन विहीरी पूर्ण करणे, मनरेगा कामावर मजूरांची उपस्थिती, शेल्फवरील मंजूर कामे व मजूर क्षमता या विषयांवर बैठकीत चर्चा करुन आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनरेगांतर्गत कामाची मागणी वाढली असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात येत आहे असे सांगितले.
बैठकीला जिल्हयातील गट विकास अधिकारी, तंत्र सहायक, व संबंधित अधिकारी उपस्थित होते.