पुणे दि ०२:- पुण्यातील एका पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . एका मराठी वृत्तवाहीनीचे पुण्यातील रिपोर्टर आहे पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. मागे पत्नी,दोन मुले आणि आई- वडील असा परिवार आहे.
पत्रकारिता क्षेत्रातील एका मराठी वृत्तवाहीनीचे बातमीदार पांडुरंग रायकर हे पुण्यातील एका नामवंत मराठी वृत्तवाहीनीचे पत्रकार असताना सुद्धा त्याला व्हेंटिलेटर बेड मिळू शकला नाही. व्हेंटिलेटर मिळण्यासाठी पत्रकार क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी प्रयत्न केले असणार यात काही वादच नाही. यामध्ये काही दैनिक काही चॅनेल या संस्थेतील अनेक पत्रकारांनी रायकर यांना मदत मिळवण्यासाठी मदत केली असणार.
पण दुर्दैवाने त्यांना एक साधा ऑक्सिजन बेड मिळवता आला नाही. जर आपनाला व्यवस्थेवर आपला कंट्रोल आहे किंवा आपण व्यवस्था बदलू शकतो हा आत्मविश्वास आहे तर साधा आपल्याला एक बेड मिळवता न येणे, हे म्हणजे दुर्दैव नाही का….म्हणजे किती आभासी जगात आपण जगतोय .यातून आपली किती ताकद आहे हे लक्षात येते .
बऱ्याच वेळा आपले ओळखीचे अधिकारी ,राजकारणी असल्याने त्यांच्या चुका होत असतानाही आपण फक्त ओळख आहे ,काहीतरी मदत करतो या नावाखाली सोडून देतो पण त्याच वेळी त्याचा योग्य बंदोबस्त केला असता तर आज अशी परिस्थिती आपल्या पत्रकार मित्रावर आली नसती. आपली व्यवस्थेवर हुकमत राहिली असती जर आपण सर्व क्षेत्रातील बतमीदारांनी तोडजोड न करता बातमीदारी केली असती तर . आज वेळ आपल्या पत्रकार
मित्रावर आली नसते
* पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला.
* त्यानंतर पांडुरंग रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले.
* 27 ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली.
* दुसर्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले.
* मात्र तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली.
* त्यानंतर रविवारी 30 जुलैला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधुन उपचारांसाठी पुण्यात आनण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं .
* जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर आय सी यु मधे उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती.
* त्यामुळं त्यांना दुसर्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले.
* मंगळवारी त्यांची ऑक्सीजन पातळी 78 पर्यंत खाली गेली.
* त्यांना जंबो हॉस्पिटलम मधून दुसर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी मंगळवारी प्रयत्न सुरू होते . मंगळवारी रात्री एक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं.
* त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या एम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते.
* तोपर्यंत बारा – सव्वाबारा वाजले होते.
* पहाटे चारला एम्ब्युलन्सम मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती.
* दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता एम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आय सी यु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला.
* पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं.
* थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
झुंजार न्यूज चॅनेल च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली