पुणे दि.०२:- गणेशोत्सव अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण देशात साजरा केले गेले आणि आज अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे विसर्जन करण्यात आले. कोव्हिड-१९ च्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भविकांवर मोठ्याप्रमाणात नियम लावण्यात आले होते. असे असले तरी देखील गणेश भक्तानी, गणेश मंडळांनी मोठे शासनास सहकार्य केले त्याबद्दल शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.गोऱ्हे यांनी आभार मानले आहेत. घरात सण असून देखील पोलीस, डॉक्टर, अधिकारी यांनी रुग्णांची अखंडित सेवा केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार आ.डॉ.गोऱ्हे यांनी मानले आहेत. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अगोदरच कोरोनाचे संकट असे दुहेरी संकट राज्यावर आले आहे. गणराया यातून राज्याला बाहेर काढा अशी प्रार्थना आ.डॉ.गोऱ्हे यांनी गणेशाच्या चरणी केली आहे. तसेच पुढील काळातील पितृपंधरवडा नवरात्र, दिवाळी या सण नागरिकांना कोरोना पासून दिलासा मिळेल अशी आशा आ.डॉ.गोऱ्हे यांनी आशा व्यक्त केली.