मुंबई:- व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये एका महिलेला अॅड करून त्या ग्रुपमध्ये अश्लील फोटो व व्हिडीओ शेअर करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला अटक माटुंगा पोलिसांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन त्या ग्रुप अॅडमिनला अटक केली.
माटुंगा येथे राहणाऱ्या एका महिलेने माटुंगा पोलिसात याबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करून उपनिरीक्षक मारुती शेळके यांनी त्या ग्रुपचा अॅडमिन मुश्ताक अली शेख (24) याला पश्चिम बंगाल येथे जाऊन अटक केली.
त्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना व्हॉटस्अॅपच्या ट्रिपल एक्स नावाने असलेल्या गुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्यांन त्या ग्रुपवर आलेले मेसेज, फोटो आणि व्हिडीओ पाहिले असता त्यांना धक्काच बसला. कारण ते सर्व अश्लील मेसेजेस, व्हिडीओ होते. त्यामुळे त्यांनी लगेच माटुंगा पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यामुळे याप्रकरणी भादंवि कलम 345, आयटी अॅक्ट 66, 67 (अ) अन्वये व्हॉटस्अॅप ग्रुपअॅडमिन वर गुन्हा दाखल केला आहे