पुणे,दि २६ :- पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी एका व्यक्तीवर गोळीबार करून कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
सर्व आरोपींना पोलीस न्यायालयात हजर करून. ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या मंदार किवळे याचा जबाब पोलिसांनी घेतला तेव्हा पोलिसांना फिर्यादीने सांगितले की. आमच्या शुभमला तूच मारलंस ना… असे सहा जणांच्या टोळक्याने मला विचारले आणि कोयत्याचे वार करायला सुरुवात केली, सहा जणांच्या टोळक्याने बुधवारी दुपारी एक वाजता मंदार किवळे याच्यावर गोळीबार करून कोयत्याने हल्ला चढवला. दोन गोळ्या मंदारला चाटून गेल्या. मंदार खाली कोसळताच त्याच्यावर कोयत्याचे वार करण्यात आले. त्यापैकी डोक्यावर, पाठीवर आणि हातावर अतिशय गंभीर वार आहेत. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी गुरूवारी सकाळी मंदार किवळे याचा जबाब घेतला. या जबाबात हल्ल्याच्या वेळी नेमके काय घडले, हे मंदारने पोलिसांना सांगितले. तूच आमच्या शुभमला मारलं ना? असा प्रश्न आधी मला दोघांनी विचारला आणि हातात असलेल्या पिस्टलने गोळी चालवली, मात्र ती गोळी मला लागली नाही. त्यावेळी गाडीवर बसलेल्या एकाने याच्या डोक्यात कोयते टाका, असे म्हणत माझ्यावर कोयत्याने वार केले आणि त्यानंतर शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, असे ते म्हणाले.
“माझ्यावर आधी गोळीबार केला, नंतर कोयत्याने वार केले आणि हल्लेखोर जोराजोरात ओरडले शुभम दादा तुझ्या खुनाचा आम्ही बदला घेतला आहे, आम्हीच कात्रजचे राजे आहोत, असे हल्लेखोर वार केल्यानंतर म्हणत होते. तसेच हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी शुभम नावाने ओरडत कोयते हवेत फिरवले, असे मंदारने पोलिसांना सांगितले.
घटना घडल्यानंतरच्या ५ तासांत ६ आरोपींना पुणे पोलिसांकडून अटक
घटना घडल्यानंतरच्या केवळ पाच तासांत पुणे पोलिसांनी मंदार किवळे हल्ला प्रकरणात अक्षय चव्हाण, बाब्या पवार, यणप्पा, रोहन कानगुडे, गणेश चव्हाण, रोहन चव्हाण या सहा आरोपींना पकडले आहे. यातील दोघांना दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अष्टविनायक मार्गावर पाठलाग करून पोलिसांनी पकडले.




























