पुणे ग्रामीण दि ०७: – लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कुमार रिसॉर्टमध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनित कॉवत यांना मिळाली व कुमार रिसॉर्ट या नामांकित हॉटेलात रंगलेल्या “हायप्रोफाइल’ जुगारावर लोणावळा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक नवनित कॉवत यांच्या पथकाने रविवारी (दि. ६) रात्री धाड टाकली. या कारवाईमध्ये एकूण ७२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २ जण पळून गेले आहेत, त्यांच्याकडील ३ लाख २० हजार ८३० रुपये रोख रक्कम व खेळासाठी वापरण्यात आलेले एक हजार व पाचशे रुपये किंमतीचे तब्बल ४० लाख ७५ हजार रुपये किंमतीचे
टोकन कॉईन पोलिसांनी जप्त केले आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण गुजरात राज्यातील व्यापारी असून, खास जुगार खेळण्यासाठी लोणावळ्यात आले होते.या कारवाईत गुजरात येथील ६० व्यापाऱ्यांसह सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या १२ महिला तसेच कुमार रिसॉर्टचे मालक धिरजलाल कुमार ऐलानी, कुमार रिसॉर्टच्या व्यवस्थापक अन्वर शेख (दोघेही राहणार मुंबई), आणि या जुगाराचे नियोजन करणारा झिशान इरफान ईलेक्ट्रिकवाला (वय ३४, रा. जोगेश्वर वेस्ट मुंबई) यांच्यावर पोलीस शिपाई विकास कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुगार प्रतिबंध अधिनियम गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लोणावळा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या कुमार रिसॉर्टमध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येऊन जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपअधीक्षक नवनीत कॉवत यांना मिळाली. त्यानंतर रविवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक नवनीत यांच्यासह त्यांच्या पथकाने ल छापा टाकत कारवाई केली कुमार रिसॉर्टमध्ये “गेमझोन बिल्डिंग’मध्ये दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये सहा टेबल लावत जुगार सुरू होती. पोलिसांनी धाड टाकत खेळात वापरलेली ३ लाख २० हजार ८३० रुपयांची रोकड, ६ हजार ३४४ रुपयांची दारू, खेळासाठी वापरण्यात येणारे १००० रुपये किंमतीचे ३६ लाख ६० हजार रुपयांचे टोकन व ५०० रुपये किंमतीचे ४ लाख ७५ हजार रुपयांचे टोकन जप्त केले आहेत.