पुणे ग्रामीण दि ०९ :- व्यसनाचा पदार्थ असलेल्या बिडी
ला दिलेलं छत्रपती संभाजी हटवा या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या संघनेतील काही पदाधिकारी पुरंदर किल्याच्या पायथ्याला उपोषणाला बसले होते. पाच दिवसानंतर संबंधित बिडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करून उपोषण सोडले आहे.शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक काटे यांनी काल सासवड पोलीस ठाण्यात साबळे वाघिरे वयवसाय समुहाच्या चेअरमन आणि संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे…याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवधर्म फाउंडेशन चे दिपक काटे, मच्छिन्द्र टिंगरे, सुनील पालवे, सागर पोमण, रवी पडवळ, दिनेश ढगे हे कार्यकर्ते पुरंदर किल्याच्या पायथ्याला चार सप्टेंबर पासून उपोषणाला बसले होते. 8 सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजता सासवड पोलिसांनी या उपोषण कर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली मात्र तरीही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर त्याना जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले… या दरम्यान तहसीलदार रुपाली सरनोबत, पीआय हाके साहेब यांनी कोविड चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपोषण सोडण्याची मागणी केली…. यावेळी उपोषण कर्त्यांनी संभाजी बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली…. त्यानुसार कंपनीचे मालक आणि संचलक मंडळ यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी आणि अपमान करत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे…साखळी आंदोलनाची घोषणा करून उपोषण माघारी घेतले आहे….