पुणे दि 18 :– पुणे शहरात प्रामाणिक पणाने काम करणारे अधिकाऱ्यांनच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर चाप बसणारे अधिकारी कामाची पद्धत असलेल्या पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांची अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान) पदी बदली झाली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहरातील सर्व अवैध व्यवसाय बंद करण्याचा व गुन्हेगारी कमी करण्याचा जणू काही विडा उचलला होता. पुणे शहरात अनेकांना देशोधडीला लावणाऱ्या लॉटरीच्या नावाखाली दोन नंबर धंदा करणारे व्यवसाय त्यांनी पुण्यात पूर्णपणे बंद केला. होता याबरोबरच मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय व हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय व जुगार, डुप्लिकेट दारू व देशी दारूचे अवैध अड्डे अशा अनेक धंद्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरू ठेऊन पोलीस ठाण्याच्या पातळीवर कारवाई न झाल्यास डॉ. वेंकटेशम यांच्या कार्यकाळात थेट गुन्हे शाखेकडून कारवाई केली जात होती. यानंतर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यास शिक्षा ही ठरलेलीच असायची. यामुळे अवैध धंदेवाल्यांबरोबच भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्येही त्यांची दहशत निर्माण केली होती.
त्यांच्या स्वच्छ व प्रामाणिक कारभाराचा फटका पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते अगदी पोलीस उपायुक्तांनाही बसला होता. यामुळे “पोलीस आयुक्तांची बदली होईपर्यंत तरी आपल्या हद्दीत कोणताचा अवैध धंदा नको,’ अशी भूमिकाच सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाइलाजास्तव घ्यावी लागली होती.
पुणे शहरात पोलिस आयुक्त झाल्यापासुनची कामगिरी
महिला, वृद्ध व लहान मुलांसाठी “भरोसा सेल’ हा वेंकटेशम यांचा “ड्रीम प्रोजेक्ट’ होता. त्यांनी तो कार्यकालात पूर्णत्वास नेला. नागपूरला असताना त्यांनी हा उपक्रम राबवला होता. त्याचा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांनी पुण्यात सूत्र स्वीकारताच सेलसाठी पावले उचलली. एकाच छताखाली महिला, वृद्ध आणि मुलांना न्याय मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यामध्ये समुपदेशन, कायद्याचे मार्गदर्शन आदी बाबींमधून न्याय मिळवून दिला जात आहे. या उपक्रमाचे पुणेकरांनी कौतुक केले आहे.
पोलिसांची छबी बदलली
डॉ. वेंकटेशम यांनी पोलीस दलाची प्रतिमा सकारात्मक करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे व सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची त्यांना चांगली साथ लाभली. चांगले काम करणाऱ्याला डॉ. वेंकटेशम यांच्याकडून कौतुकाची थाप ठरलेलीच असायची. याबरोबरच त्याच्या कामाची दखल बक्षीस तसेच दर महिन्याला निघणाऱ्या पुस्तिकेतून केली जात होती. पोलीस कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाच्या बातम्यांची कात्रणे आयुक्तालयाच्या भिंतीवर लावण्याचा उपक्रमही केला. लॉकडाऊन काळातील पोलिसांनी जीव तोडून केलेले कार्य त्यांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले. यामुळे एकंदरीच पुणे पोलिसांची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये सकारात्मक झाली. व व प्रामाणिक पणे काम करणाऱ्या अधिकार्यांची व कर्मचाऱ्यांची मान ही ताट दिसून येत होती