पुणे ग्रामीण दि २२: – पुणे दौंड तालुक्यातील रावणगाव येथे घरा समोरून लावलेला ट्रॅक्टर दि ८ ते ९ सप्टेंबर रोजी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. या चोरीचां गुन्हा उघडकीस आला असून आरोपींना पुणे ग्रामीण पोलिस एलसीबी शाखेने अटक केली असून त्यांच्या जवळील ६,लाख ८०,हजार रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर जप्त केला आहे.गणेश नंदकुमार भागवत ( वय २५ वर्षे रा.पाटस ता.दौंड जि.पुणे),बाबासाहेब उर्फ भाऊ गाढवे (वय २७ वर्षे), मंगेश गाढवे (वय २६ दोन्ही रा.रावणगाव ता.दौंड जि.पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि ८ ते ९ सप्टेंबर रोजी घरा समोरून लावलेला ट्रॅक्टर चोरी करून नेला होता त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. LCB टिमला रावणगाव पुणे येथे सदर ट्रॅक्टर चोरीतील तीन व्यक्ती असल्याची गोपनीय माहिती मिळाली.व माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेवून त्यांचेकडे खाकीचा हिसका दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन सदर चोरीचा ट्रॅक्टर प्रवीण उर्फ भैय्या बबन हरणावळ रा.श्रीराम सोसायटी इंदापूर याला विकलेचे सांगितलेने सदरचा ट्रॅक्टर ६,लाख ८०,हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टरचा जप्त केला असून सदर तीनही आरोपी दौंड पो.स्टे. चे ताब्यात दिलेले आहे.सदर कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पो.ना.सुभाष राऊत, गुरु गायकवाड, चा.पो.शि.अक्षय जावळे यांनी केलेली आहे.