पुणे दि २३ :- पुण्यातील बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये लॉकडाऊच्या काळात बिबवेवाडीचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहकारी पेट्रोलींग करत असताना अनेक दिवासापासून आजारी असलेला कुत्रा दिसला.घाडगे यांनी भूतदया दाखवित त्या कुत्र्याला औषधोपचार करुन पोलिस स्टेशनला आणले.गेल्या चार महीन्यापासून हा कुत्रा पोलिसासमवेत पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहतोय शिवाय रात्री मार्शल सोबत पोट्रोलिंग देखील करतोय. पोलिस स्टेशनच्या आवारात कोणी मोठ्या आवाजात बोलत असेल तर त्यांच्यावर भुंकतो. पोलिसांचा साथीदार बनलेल्या या अनोख्या कुत्र्याची बिबवेवाडी परीसरात एकच चर्चा रंगलीय.पहाटेच्या पोलिसांच्या कोंबींग अॉपरेशनमध्ये आरोपीचा शोध घेताना आरोपी जर पळत असेल तर त्याचा पाठलाग करुन त्याना जेरीस आणतो.लॉकडाऊन काळात पोलिसांनी याला लळा लावला त्याला औषधोपचार अन् खाऊ घातले. त्यानंतर त्या उपकाराची परतफेड म्हणून की काय पोलिसांना अहोरात्र मदत करणाऱ्या या अनोख्या पोलिसमित्र कुत्र्याची चर्चा अन् कौतुक केलं जातयं.