पुणे ग्रामीण दि २४ : -पुणे भिगवण पोलीस कोविड योद्धा म्हणून काम असतानाच मस्तावलेल्या वाळू माफियांनी मांडलेला उछाद अखेर भिगवण पोलिसांच्या कारवाई मुळे बंद पडला असल्याचे दिसून आले.भिगवण पोलीस ठाण्याच्या अधिकारी जीवनराव माने यांनी आज केलेल्या कारवाईत वाळू माफियांचे कंबरडे मोडले आहे.भिगवण पोलीस ठाण्याचे इन्कलाब रशीद पठान यांनी दिलेल्या माहिती नुसार अवैद्य प्रकारे व कोणत्याही प्रकारची रॉयलटी भरली नसताना दोन अवाढव्य फायबर आणि बोटी उजनी धरणाच्या पाण्यातून वाळू उपसा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.व भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी पथकाला सोबत घेत बुधवारीच्या मध्यरात्री उजनीच्या जलाशयात तपासणी सुरु केली.यावेळी भिगवण पोलिसांनी या बोटीवर प्रवेश करीत ताबा मिळवित साडेबारा लाख रुपयाचा माल जप्त करीत या बोटीतील आठ कामगार आणि तीन बोटी मालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.याबाबत शौकत कमरुद्दीन शेख वय ३२ ,बहुद्दिन मुजालीम शेख ,वय २० ,रफिक दानेश शेख .वय.३२ ,हनन बजरुद्दिन शेख मनीरूल कामुरुद्दिन शेख ,रोहित शेख सर्वजण झारखंड येथील आहेत.तर बोट मालक सोन्या बाळासाहेब सरक वय २५ रा.कात्रज ता.करमाळा ,ज्ञानेश्वर शिवाजी सोळंखे रा.विरवाडी मदनवाडी यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.यातील सात आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले व न्यायलयात रवानगी केली आहे.तर बोट मालक आणि चोरीसाठी मदत करणारांची भिगवण पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.भिगवण पोलिसांनी या कारवाईत पकडलेल्या बोटी महसूल विभागाच्या माध्यमातून बोटी नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी दिली.
भिगवण पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक करण्यात येत आहे व भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी उजनी धरणातील वाळूचोरी विरोधात यापुढेही जोरदार कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.अधिक तपास हवालदार वीर नाना करीत आहेत