पुणे दि ०५ :-पुणे जिल्ह्यातील खोडग गावच्या तलाठ्याला 1 हजार रुपयांची लाच (corruption ) घेताना एसीबीने रंगेहात पकडले. शेतकऱ्याकडून त्याने कर्ज घेतले. सुनील राणे (रा. जुन्नर) असे पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनील राणे हा जुन्नर तालुक्यातील खोडग गावचा तलाठी आहे. यातील तक्रारदार यांनी शेतीवर 7 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यादरम्यान त्याची नोंद सात बाऱ्यावर करायाची होती. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. यावेळी लोकसेवक सुनील यांनी त्यांच्याकडे लाचेची मागणी केली. त्याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.त्यानुसार आज सापळा कारवाईत सुनील यांना 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , श्रीमती सुषमा चव्हाण , अपर पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक. संजय पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास 1068 क्रमांकावर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री . राजेश बनसोडे , पोलीस उप – आयुक्त / पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , पुणे यांनी केले आहे .