पुणे ग्रामीण दि १०:- पुणे ग्रामीण परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई होत असल्याने, पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी शिरूर परिसरात दि ०९ रोजी शारजा स्टेडियम दुबई येथे सुरू असलेल्या राजस्थान रॉयल व दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यावर शिरूर हलवाई चौक येथे राहते घराचे तिसऱ्या मजल्यावर इसम नामे राहुल गोरख घोडके हा बेटिंग घेत असल्याबाबत पुणे जिल्हा (ग्रामीण) यांना गोपनीय माहिती मिळाली व पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने शुक्रवारी (ता. ९) संबधित राहते घराचे तिसऱ्या मजल्यावर छापा टाकून,73,हजार 505 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगतसाठा जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण कडील पथक पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 09-10-2020 रोजी शारजा स्टेडियम दुबई येथे सुरू असलेल्या राजस्थान रॉयल व दिल्ली कॅपिटल यांच्यामध्ये खेळल्या जाणाऱ्या ड्रीम इलेव्हन ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यावर शिरूर हलवाई चौक येथे राहते घराचे तिसऱ्या मजल्यावर इसम नामे राहुल गोरख घोडके हा बेटिंग घेत असल्याबाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट सो. यांना बातमी मिळाली, त्यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि पृथ्वीराज ताटे , पोसई अमोल गोरे, सहा.फौज.दयानंद लीमन, पो.हवा. रौफ इनामदार, पो.ना. मोमीन, शेळके, म.पोना कांबळे, पो.कॉ.अक्षय जावळे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता, इसम नामे राहुल गोरख घोडके हा बेटिंगचे साहित्य जागेवर टाकून त्याचे बिल्डींग वरुन बाजूचे बिल्डींगवर पळून गेला.सदर ठिकाणावरून एक इंटेक्स कंपनीचा एलसीडी टीव्ही , विवो कंपनीचा मोबाईल फोन, रोख रक्कम रुपये 12 हजार 280, दोन फुलस्केप रजिस्टर, एक सेट टॉप बॉक्स असा एकूण 73 हजार,505 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याचेवर जुगार प्रतिबंधक अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई,.डॉ. अभिनव देशमुख सो.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण. मिलिंद मोहिते अपर पोलीस अधीक्षक सो बारामती,उपविभागीय अधिकारी धस सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली,
सपोनि पृथ्वीराज ताटे ,पोसई/अमोल गोरे,सफौ/ दयानंद लिम्हण,पोहवा/रौफ इनामदार, पोना जनार्दन शेळके
पोना राजू मोमीन म पो ना पुनम कांबळेपोशि अक्षय जावळे यांनी केलेली आहे.