पुणे दि १७ :- अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी प्रस्तावित पुणे ते दौंड व दौंड ते पुणे या रेल्वे लोकल सेवेचा लाभ घेता येईल . सध्या सर्वत्र कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरु असुन त्या अनुषंगाने शासनाकडुन घालण्यात आलेले निर्बंध सुरु आहेत . परंतु अत्यावश्यक सेवा पुरवणा – या कर्मचा – यांसाठी पुणे ते दौंड सकाळी ०६.०० वा.व संध्याकाळी १७.२० वा तसेच दौंड ते पुणे सकाळी ०७.४५ वा . व संध्याकाळी १९ .१५ वा अशी लोकल ट्रेन सेवा दि २०/१०/२०२० पासुन सुरु करण्याचे प्रस्तावित असुन त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व इतर संबंधित वरीष्ठ अधिका – यांची बैठक झाली असुन पुणे शहर व पुणे महानगर पालिका हददीतील सर्व शासकीय कार्यालय , विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग , जिल्हाधिकारी कार्यालय पुणे शहर , आयुक्त कार्यालय पुणे महानगर पालिका , आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड महानगर पालिका , व्यवस्थापकीय संचालक कार्यालय पी एम पी एम एल पुणे जिल्हापरीषद पुणे , निगडी प्राधिकरण , जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पुणे , सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे , जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय बालेवाडी पुणे , आदिवासी संशोधन व प्रशिक्षण विभाग पुणे इत्यादी कार्यालयांशी पोलीस आयुक्त कार्यालय पुणे शहर यांचे मार्फतीने त्यांच्या आस्थापनेवरील अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांना लोकल ट्रेनचा प्रवास करावयाचा असल्यास कोरोना विषाणुच्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी तसेच अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी डिजीटल पास / परवानगी मिळविण्याकरीता आवश्यक कागदपत्रे व इतर सुचना इत्यादी संदर्भात माहिती पुरविण्यात आलेली आहे . सर्व स्थानकांवर येणा – या जाणा – या अत्यावश्यक सेवेतील प्रत्येक कर्मचा – याची थर्मल स्कॅनींगद्वारे तपासणी केली जाईल . स्थानिक परीसरामध्ये येणारे व जाणारे मार्ग निश्चित केले जातील . तसेच रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरामध्ये कोणतेही फेरीवाले बसणार नाहीत . तसेच रेल्वे स्थानकाकडे येणा – या रस्त्यांमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत याची कटाक्षाने दक्षता घेण्यात यावी . रेल्वे स्थानक परिसरामध्ये स्थानिक नगरपालिका अधिका – यांकडुन दिशा दर्शक फलक लावण्यात येतील . तसेच स्थानकाच्या संपुर्ण परिसराचे बॅरीकेटींग केले जाईल . पुणे महानगर पालिकेच्या वतीने सर्व रेल्वे स्थानकावर समन्वय अधिकारी नेमले जातील . पुणे पोलीस विभाग व पुणे महानगर पालिका हे दोन विभाग एकमेकांशी समन्वय साधुन काम करतील . पुणे महानगर पालिकेकडुन प्रत्येक फेरीनंतर रेल्वेगाडीचे निर्जंतुकीकरण केले जाईल . त्याचप्रमाणे दिवसअंती रेल्वेप्रशासनाकडुन प्रत्येक रेल्वेगाडीचे निर्जंतुकीकरण केले जाईल . लोकल ट्रेन सेवा सुरु करण्यासंदर्भातील कती योजना ही पुढीलप्रमाणे असेल . अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी यांची माहिती विविध विभागामार्फत मागविली असुन प्रवासाकरीता संबंधित व्यक्तीसाठी क्यु आर कोड आधारीत ई पास प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे . तसेच पुणे ते दौंड व दौंड ते पुणे प्रवासाकरीता एकुण ३१ पासेस देण्यात आलेले असुन यापुढेही या सुविधेचा लाभ घेण्यासाठी www.punepolice.gov.in या लिंकवर जाऊन कार्यालयाचे पत्र , आयडी कार्ड , फोटो , फिटनेस प्रमाणपत्र व इतर माहिती भरुन अर्जदार यांना अर्ज ऑनलाईन प्रस्तुत करावा लागेल . पुणे पोलीस आयुक्तालया मार्फत सदर अर्जाची पूर्णतः पडताळणी होऊन प्रवासाकरीता त्यांच्या नमुद संपर्क क्रमांकावर क्यु आर कोड प्राप्त होईल . अशाप्रकारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचा – यांसाठी प्रस्तावित पुणे ते दौंड व दौंड ते पुणे या लोकल सेवेचा लाभ घेता येईल .