पुणे दि १७ : – पुणे शहरात पोलिसांचा रेकॉर्डवरील गुन्हेगाराने स्वतःचे नावाने बनावट ओळखपत्र तयार करुन तो त्याचा स्वतःच्या फायद्याकरीता तो वापरत होता पुणे पोलीसांचे नावाने गणवेश घालून फिरणाऱ्या एका तोतया पोलिसाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याजवळ पुणे पोलिसांचे बनावट ओळखपत्र होते.
इम्तियाज इंद्रिस मेमन (वय 41, रा. तिरुपती गृहरचना सोसायटी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. व पोलीस नाईक अंकुश जोगदंडे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हे गुन्हे शाखेच्या युनिट 5 मध्ये नेमणुकीस आहेत. दरम्यान एक व्यक्ती वरिष्ठ अधिकाऱ्याना एक तोतया पोलीस खंडणी मागत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार ही माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 5 ला देण्यात आली.गुन्हे शाखेने त्याचा शोध घेतला. यावेळी मेमन हा महाराष्ट्र पोलिसांचा गणवेश तसेच पुणे पोलिसांचे ओळखपत्र घेऊन फिरत असल्याचे समजले. यानुसार त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर हडपसर वानवडी पोलीस ठाणे , येथे , दंगल , जाळपोळ , खंडणी अशाप्रकारे पाच गुन्हे दाखल आहेत. तो एक हॉटेल चालवत होता, असे सांगण्यात आले.
पुणे पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र सन २००७ पासुन त्याचा वापरत करीत असल्याने त्याचेविरुध्द हडपसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे . तसेच नागरिकांना आव्हान करण्यात येते की , जर कोणी इसम पोलीसांचे बनावट ओळखपत्रचा वापर करीत असल्याचा संशय आल्यास आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी , संबधीत पोलीस ठाणेचे अधिकारी , पोलीस नियंत्रण कक्ष , पुणे शहर यांचेशी तात्काळ संपर्क साधावा , त्याबाबतची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल . सदरची कारवाई ही.अशोक मोराळे सो .अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे शहर , बच्चन सिंह .पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , पुणे शहर .लक्ष्मण बोराटे .सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे २ , पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -५ चे प्रभारी अधिकारी वपोनि. भास्कर जाधव , स.पो.निरी . संतोष तासगांवकर , पो.उप.नि.शेंडगे , पोलीस स्टाफ प्रदीप सर्वे , भरत रणसिंग , अहमज पठाण , दया शेगर , अंकुश जोगदंडे , संजयकुमार दळवी यांनी ही कामगिरी केलेली आहे .