पुणे दि १९ :- पुणे शहरातून शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून अपहरण केलेल्या वकिलाचा दिनांक ०२.१०.२०२० रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे मिसिंग फिर्यादी दाखल होती चंद्रशेखर मोरे यांनी रोजी त्यांचा भाऊ नामे उमेश चंद्रशेखर मोरे रा . प्लॅट नं . ९ दुसरा मजला गु अपार्टमेंट , पवार हॉस्पीटल शेजारी बालाजीनगर धनकवडी , पुणे हे दि . ०१.१०.२०२० रोजी पुणे शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरातून मिसिंग झाल्याबाबत तक्रार दिली होती सदर मिसिंगच्या प्राथमिक तपासामध्ये उमेश मोरे याचे कोणीतरी अपहरण केल्याचे निष्पन्न झाल्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा नोंद केला होता यादरम्यान पुणे बार असोसिएशन व काही राजकिय पक्षांचे शिष्ठमंडळांनी यांनी पोलीस आयुक्त – यांना भेटून गुन्हयामधील अपहरीत इसमाचा व आरोपीचा शोध होणेबाबत निवेदन देण्यात आले होते गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून अपहरीत वकिलाचा शोध घेणेकरीता शिवाजीनगर पोलीस तीन तपास पथकांची नेमणूक करून अपहरीत इसमाचा अहोरात्र पुणे शहर पोलिसांनी तपास सुरू केला . तपासादरम्यान आधुनि तंत्रज्ञानाचा , गोपनीय बातमीदारांचा तसेच तपास कौशल्याचा वापर करून गुन्हा उघडकिस आणला आहे व खून करणारे आरोपीला गजाआड केले आहे आरोपी १ ) कपिल विलास फलके वय ३४ वर्षे रा . रामदासनगर औदुयत हौसिंग सोसायटी , चिखली , पुणे २ ) दिम शिवाजी वांडेकर वय २८ वर्षे रा , पोस्ट सालेवड गांव ता . आष्टी जि . बीड , ३ ) रोहीत दत्तात्रय शेंडे वय : वर्षे रा . स्वामी विवेकानंद सोसायटी , बंगला क्र .५ , संतनगर , मार्केट यार्ड पुणे या संशयीतांना अटक केली आसता तपासा दरम्यान आरोपीने अपहरीत वकिलाचे अपहरण करून खून केल्याची कबुली दिल आहे . सदर गुन्हा उघडकीस आणण्याची विशेष कामगिरी पोलीस आयुक्त सो पुणे शहर , पोलीस आयुक्त साो पुणे शहर , डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे , डॉ . प्रियांका नारनवरे , पोलीस उपआयुक्त परिमंडळ -१ , सुधाकर यादव, सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग , बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक , शिवाजीनगर पोलीस ठाण यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती मनिषा झेंडे पोलीस निरीक्षक गुन्हे , विजयकुमार शिंदे सहायक पोलीर निरीक्षक , संदीप चव्हाण पोलीस उपनिरीक्षक , कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक , पोहवा . आत्तार , राजपूत . फडतरे , सय्यद , मपोना . बुट्टे , पोशि , रासकर , होळकर , राऊत , मोरे , डमढेरे , वीर , तसेच सायबर विभागाकडील , पोहवा आत्तार , पोहवा . इनामदार पोशि . चलवादी , जाधव यांनी अहोरात्र तपास करत उत्कृष्ट कामगिरी करून जनमाणसात पोलीसांची प्रतिमा उज्वल केली आहे .