पुणे दि २० : – पूर्ववैमनस्यातून काल पुणे औंध परिसरात भरवस्तीत कुऱ्हाडीने वारकरून क्षितीज लक्ष्मीकांत वैरागर , वय -२४ वर्षे , रा.घर नं .३२५ , औंध गाव , पुणे तरुणाची खुन केल्यानंतर आज त्या तरुणाच्या मित्रांकडून आरोपीच्या भावाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे औंध परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंत्यविधी झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे. प्रशांत दीक्षित (वय 22) असे आज जखमी झालेल्याचे नाव आहे. तर क्षितिज कांताराम वैरागर (वय 24, रा. औंध गाव याचा खून काल सायंकाळी 7 वाजता झाला होता. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी अनिकेत दिलीप दिक्षित वय -२३ वर्षे , रा.औंध , पुणे याला पकडले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैरागर व आरोपींमध्ये पूर्वीचे वाद होते.क्षितिज याने तीन महिन्यांपूर्वी अनिकेत याच्यावर वार केले होते. या रागातून अनिकेत याने काल क्षितिज याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला होता. क्षितिज याच्यावर पहिला खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. तर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात यापूर्वीचा असे दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान आज क्षितिजचा अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर क्षितिज याच्या मित्रांकडून प्रवीण याच्यावर वार करण्यात आले आहेत. स्पायसर रोडवर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अधिक तपास चतुःश्रृंगी पोलिस करत आहे.